भाजीपाला पिकाची काढणी - भाग ३

SV    14-Feb-2025
Total Views |
 
                      साठवणुकीचे नियोजनात भाजीपाला थंड करणे, योग्य साठवणूक पद्धतीचा वापर करणे, पॅकेजिंग, वाहतूक, तपासणी, भाज्यांची प्रक्रिया इ. बाबींचा समावेश होतो. भाजीपाला साठवताना उष्णता निघून जाण्यासाठी भाजीपाला थंड करणे गरजेचे असते. भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीने थंड केला जातो. थंड केल्यामुळे भाजीपाल्याचा रंग, पोत, चव टिकून राहते, तसेच श्वसनक्रिया मंदावते, आतील पाण्याचा नाश कमी होतो, इथिलीनची निर्मिती कमी होते, भाजीपाला कुजण्याची क्रिया मंदावते.
भाजीपाल्यामध्ये पॅकेजिंगचे महत्व 
                   भाजीपाल्यामध्ये पॅकींगचे विशेष महत्व आहे. कारण योग्य पॅकिंगमुळे भाज्यांचे श्वसन, बाष्पीभवन आणि पिकण्याच्या क्रियेचा वेग कमी होतो आणि भाज्यांच्या बाहेरील रोगजंतूशी येणारा संसर्ग टाळला जातो आणि त्यामुळे भाज्यांचे नुकसान कमी होते.
* पॅकिंगसाठी भाजीपाल्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे साहित्य वापरली जातात. उदा. टोमॅटोसाठी लाकडी व पुठ्याची खोकी, भेंडी, मिरची, वांगी, पालेभाज्या यासाठी बांबूच्या टोपल्या तसेच अलिकडे कोरोगेटेड पेट्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा पॅकिंगसाठी वापर करण्यात येत आहे.
* पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो. त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो.
* जर एखाद्या पॅकेटमध्ये कमी गुणवत्तेचा माल असेल, तर तो एका पॅकेटमधून दुसऱ्या पॅकेटला लागतो. पॅकेजिंग चांगले असेल तर असे होत नाही.
* या उत्पादनांचे शेल्फ लाइफ/टिकवण क्षमता वाढवण्यासाठी, व्हॅक्यूम पॅकिंग आणि सुधारित-वातावरण (एमए-मॉडिफाईड अँटमोस्फिअर) पॅकेजिंगचा वापर केला जातो.

कृषी पणन मित्र, फेब्रुवारी २५