महाकुंभमेळ्यातील ४६ कोटी भाविकांच्या स्नानानंतरही गंगा नदी शुद्ध!

SV    17-Feb-2025
Total Views |
 
महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ४६ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. प्रतिदिन यात लाखो लोकांची वाढ होत आहे. असे असले, तरी गंगा नदीचे पाणी अस्वच्छ झालेले नाही. या संदर्भातील संशोधन नागपूर येथील 'नीरी'च्या ('राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थे'च्या) संशोधकांनी केले आहे. यात लक्षात आले की, कोट्यवधी लोकांनी स्नान केल्यानंतरही काही काळानंतर गंगा नदी स्वतःला मूळ स्थितीत आणते. गंगा नदीमध्ये घाण स्वच्छ करण्याची शक्ती आहे. स्नानाच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत गंगा नदीचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ दिसत आहे. जेथे लोक स्नान करतात, तिथे गंगा नदी ३ - ४ दिवसांत शुद्ध होते. येथे कधीच साथीचे रोग पसरत नाही. गंगा नदीचे पाणी अनेक वर्षे साठवून ठेवले, तरी ते खराब होत नाही.
              'नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा' या उपक्रमाच्या अंतर्गत गंगेच्या पाण्यावरील संशोधनाचे काम 'नीरी' या संस्थेकडे सोपविण्यात आले होते. सुमारे २ वर्षे नीरीने २ सहस्र ४०० किलोमीटर वहाणाऱ्या गंगा नदीचे ३ टप्प्यांत संशोधन केले. गंगा नदीचे उगमस्थान असलेले गोमुख ते हरिद्वार, हरिद्वार ते पाटलीपुत्र आणि पाटलीपुत्र ते जाफरनगर (बंगाल) असे तीन टप्पे होते. यांपैकी गोमुख ते हरिद्वार या पहिल्या भागात गंगा नदीत ३ प्रमुख घटक आढळले. त्यामुळे गंगा नदीचे वहाते पाणी केवळ शुद्धच रहात नाही, तर घरात आणलेले आणि ठेवलेले पाणी वर्षानुवर्षे खराब होत नाही. 
               संशोधनाच्या काळात गंगा नदीच्या ५० हून अधिक ठिकाणांची चाचणी घेण्यात आली. शास्त्रज्ञांच्या पथकाला गंगा नदीच्या पाण्यात जंतूनाशक 'बॅक्टेरियोफेज' आढळले आहेत, जे एक प्रकारचे विषाणू आहेत. त्यात रोग पसरवणाऱ्या जीवाणूंशी लढण्याचे गुणधर्म आहेत.
            'नीरी'च्या शास्त्रज्ञांना गंगेच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजनही ('प्राणवायू 'ही) आढळला.  गंगा नदीच्या पाण्यात २० मिलीलीटरपर्यंत ऑक्सिजन आढळून आला आहे. शास्त्रज्ञांनी या पाण्यात 'टर्पीन ' मिठाचे 'फायटोकेमिकल' ही शोधले आहे. गंगा नदीच्या नैसर्गिक शुद्धीकरणात हे ३ घटक प्रभावी ठरतात.
सनातन प्रभात १४.२.२५