इंफाळ : सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व आणि थौबल जिल्ह्यातून विविध प्रतिबंधित संघटनांशी संबंधित नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे. अपहरण आणि खंडणीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या प्रतिबंधित कांगलेपाक कम्युनिस्ट पक्षाच्या (नोयॉन) चार सक्रिय सदस्यांना शुक्रवारी थौबल जिल्ह्यातील चिंगडोमपोक भागातून अटक करण्यात आली.
आणखी एका कारवाईत सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खवेसोई भागातून खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या चौघांना अटक केली; तसेच इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मुंगोई अवांग लेईकाई भागात पोलिसांनी शुक्रवारी एकाला अटक केली.
महाराष्ट्र टाईम्स १६.२.२५