यमुना नदीच्या शुद्धीकरणास सुरुवात
SV 18-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली - यमुना नदीच्या शुद्धीकरणास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी रविवारी दिली. ट्रॅश स्कीमर, बीड हार्वेस्टर आणि ड्रेज युटिलिटी क्राफ्ट मशिनच्या माध्यमातून नदीतील घाण काढली जात आहे. नदीचे प्रदूषण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे चार टप्प्यात व्यापकपणे शुद्धीकरण करण्याची मोहीम राबविली जाणार आहे,
असे होणार शुद्धीकरण
सर्वप्रथम नदीच्या प्रवाहातील कचरा आणि गाळ काढला जाईल. त्यानंतर नजफगड नाला, इतर नाले व अन्य सर्व नात्यांची सफाई केली जाईल. त्यापाठोपाठ शुद्धीकरणाची अन्य कामे हाती घेतली जाणार आहेत.
तीन वर्षांच्या आत यमुना नदीची साफसफाई करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध संस्था आणि विभागांच्या दरम्यान ताळमेळ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे विभाग आणि संस्था या मोहिमेत सहभागी होणार आहेत, त्यात दिल्ली जल बोर्ड, जलसंधारण आणि पूर नियंत्रण विभाग, दिल्ली महानगरपालिका, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दिल्ली विकास प्राधिकरण यांचा समावेश आहे.
सकाळ १७.२.२५