आराखडा जल स्वयंपूर्ण गावचा

SV    20-Feb-2025
Total Views |
 
             तापमानाचा पारा जसजसा वाढतो आहे तसतशी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी पाण्याचे नियमन करणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने शासनाने जल आराखडा तयार केला आहे.
            सिंचन हा ग्रामीण विकासाचा पाया आहे. पाणी नसेल तर शाश्वत शेती उत्पादन होत नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी धरणे बांधण्यात आली. यामुळे सगळीकडे पाणी मिळेल असे सांगितले गेले पण तसे घडले नाही. विहीरी,बारव,तलाव,सरोवर, नदया-नाले अशा पारंपारिक जलस्त्रोतांमध्ये पाणी नाही किंवा हे स्त्रोत नष्ट केले गेले आहेत. त्यामुळे या सगळ्यावर उपाय म्हणून राज्यभर जल साक्षरता उपक्रम घेऊन याबद्दलची जागृती शासन निर्माण करत आहे. 
           जलसाक्षरता उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यशदा येथे जलनायक,जलप्रेमी योद्धा,जलदूत,जलसेवक व जलकर्मी प्रशिक्षकांची कार्यशाळा पार पडली. आणि सर्व गावे जल स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला. 
गावातील पारंपारिक स्त्रोत पुनरुज्जीवित करावेत, ज्या गावात एकही पारंपारिक स्त्रोत नाही अशांनी गावाला वर्षभर पुरेल एवढे मोठे जलकुंड करून त्यात पाणी साठवावे. शेत तेथे विहीर अथवा शेततळे ही संकल्पना राबवावी आणि सर्वात महत्वाचे पाण्याचा वापर काटकसरीने केला जावा असे उपाय सुचवण्यात आले.
अॅग्रोवन,सकाळ १९.२.२५.