आग्रा किल्ल्यात शिवगर्जना; शिवजयंतीचा जल्लोष

SV    20-Feb-2025
Total Views |
 
     आग्रा भेटीला बोलावून ज्याठिकाणी औरंगजेबने हीन वागणूक देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, ज्याने छत्रपतींचा स्वाभिमानी, करारी बाणा अनुभवला होता, तोच आग्रा येथील ऐतिहासिक किल्ला बुधवारी गगनभेदी शिवगर्जनेने दुमदुमून गेला. ३५० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या क्षणाचा साक्षीदार असलेल्या येथील जहांगीर राजवाड्यात शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा सर्वांनी 'याचि देही याची डोळा' अनुभवला. महाराष्ट्राची शान तुतारी, ढोल-ताशांचा दणदणाट अन् जाणता राजाच्या शौर्यगाथेने उपस्थितांची छाती अभिमानने फुगली.
     या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार फडणवीस, विधानसभेचे सभापती राम शिंदे, तसेच केंद्रीय राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल, मंत्री योगेंद्र उपाध्याय!
      आग्रा शहरात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबने ते सध्याचे ठिकाण मीना बाजार कोठी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासन ही जागा खरेदी करेल व तिथे भव्य स्मारक बांधेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकमत २०/०२/२५