संभलमधील विस्थापित हिंदुंना ४७ वर्षांनी त्यांची जागा परत मिळाली
SV 21-Feb-2025
Total Views |
संभल- १९७८ सालच्या दंगलीनंतर संभलमधील हिंदुंना तिथून हाकलून देण्यात आले होते. उत्तर प्रदेश प्रशासनाने तेथील १० हजार चौरस किलोमीटर जमीन मुक्त केली आणि मूळ मालकांना परत केली. तहसीलदार डॉ. वंदना मिश्रा या फौजफाटा घेऊन कोतवाली भागातील नवी सराईत पोचल्या आणि तेथील जमिनीचे मोजमाप केले. सती मठाच्या जागेवर चारी बाजूंनी भिंती बांधून अवैध बांधकाम केले होते. ते पाडून जमीन मोकळी करण्यात आली.
दंगलीनंतर भयभीत होऊन पळून गेलेल्या हिंदूंची घरे आणि संपत्ती यावर दंगलखोरांनी कब्जा केला होता. पीडित लोक अनेक वर्षे याविरोधात संघर्ष करीत होते. अखेर योगी प्रशासनाकडून त्यांना न्याय मिळाला.
अवध प्रहरी १६.१.२५