बालाघाटमध्ये चार नक्षली ठार

SV    21-Feb-2025
Total Views |
 
       बालाघाट- मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये चार नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
      राज्य पोलिसांचे विशेष पथक आणि स्थानिक पोलिस या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. चकमक झालेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. बालाघाट जिल्ह्याची सीमा गोंदिया जिल्ह्याला लागून आहे. हा सगळा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. येथे काही जखमी नक्षलवादी लपल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे
सकाळ २०.२.२५