नवी दिल्ली : तटरक्षक दलासाठी १४९ अत्याधुनिक रेडिओ खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी भारत इलेक्ट्रॉनिक्सशी १,२२० कोटींचा करार केला. या करारामुळे तटरक्षक दलाला हाय स्पीड डेटाद्वारे सुरक्षित आणि विश्वासार्ह माहितीची देवाणघेवाण करता येईल. त्याचप्रमाणे, हे रेडिओ नौदलाबरोबरच्या संयुक्त अभियानात आंतरसंचालन क्षमता वाढवतील, असे निवेदनात म्हटले आहे.
सकाळ २१.२.२५