अयोध्या : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराकडेही मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. राम मंदिरात भाविकांनी प्रचंड देणग्या दिल्या आहेत. २० दिवसांमध्ये भाविकांनी दिलेल्या देणग्यांची मोजदाद करताना मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. राम मंदिरालाही रोज लाखो भाविक भेट देत आहेत.
दानपेटीवर पोहोचण्यात अडथळे येत असल्याने राम मंदिराच्या आवारात भाविक देणग्या टाकत आहेत. मंदिर परिसरात पसरलेल्या देणग्या गोळा करताना आणि मोजताना ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. गेल्या वर्षभरात राम मंदिरात भाविकांनी ७०० कोटींहून अधिक देणगी दिली असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
पुढारी २१.२.२५