गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अन्वीचा आणखी एक विश्वविक्रम

SV    24-Feb-2025
Total Views |
 
पाच वर्षांच्या अनिता चेतन घाटगे हिने हिमालय पर्वत रांगेत १२,५०० फूट उंचीवर आणि उणे ५ अंश सेल्सिअस तापमानात असलेल्या केदारकंठा शिखरावर चढाई करून विश्वविक्रम केला आहे आणि ती जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. गिर्यारोहक अन्वी हिने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त शिखरावर शिवध्वज फडकावून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.  १६ फेब्रुवारीला अन्वी डेहराडूनपासून २१० किलोमीटरचा प्रवास करून तिच्या आई-वडिलांसोबत सकरीला पोहोचली. केदारकंठा पर्वतावर मुख्य चढाई  १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. उणे ६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान, गोठवणारी थंडी, शिखरावर चढताना ऑक्सिजनची कमतरता, बर्फावरची निसरडी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत २ दिवसांची चढाई केल्यानंतर अन्वी १८ फेब्रुवारीला बेस कॅम्पवर पोहोचली. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता पुन्हा शिखर चढण्यास सुरुवात केली. अन्वीने उणे १५ अंश सेल्सिअसच्या अत्यंत थंड तापमानात बर्फाच्छादित अंधारात, निसरड्या बर्फावरून चालत तिच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची चाचणी घेतली. सकाळी ७ वाजता, सूर्योदयाच्या वेळी शिखरावर पोहोचली. आणि केदारकंठ शिखरावर भगवा शिव ध्वज फडकवला. या मोहिमेत प्राध्यापक अनिल मगर, प्रशिक्षक व आई अनिता घाटगे, वडील चेतन घाटगे, मार्गदर्शक मनोज राणा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.

दैनिक भास्कर २२/०२/२५