गेल्या २४ तासांत मणिपूरच्या ४ जिल्ह्यांतून बंदी घातलेल्या संघटनांच्या १७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग कियाम लीकाई भागातून 'कांगलेई यावोल कन्ना लुप' या प्रतिबंधित संघटनेच्या १३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. एकूण २७ काडतुसे, तीन 'वॉकीटॉकी सेट', लष्कराचा गणवेश आणि इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या लोकांना सविस्तर चौकशीसाठी इम्फाळ येथे नेण्यात आले आहे. 'युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट-पी' या प्रतिबंधित संघटनेच्या एका अतिरेक्याला इंफाळ पूर्व जिल्ह्यातील नगारियन चिंग परिसरातून अटक करण्यात आली. ते लोकांकडून बळजबरीने पैसे उकळत होते.
नवभारत २२/०२/२५