२८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. आणि २०१५ पासून ११ फेब्रुवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दोनही दिवसांचे औचित्य साधून जाणून घेऊ तीन महिला वैज्ञानिकांबद्दल :
मणिपूरमधील एस.बी.ट्विएला
पर्यावरणसंदर्भातील विविध समस्यांवर एस.बी.ट्विएला काम करते. ती कायम वास्तविक आणि कृतिशील उपाय शोधण्यावर भर देते. तिचं संशोधन हे केवळ एक नेमून दिलेलं काम न राहता तिच्यासाठी ही वैयक्तिक जबाबदारी ठरते. सध्या ती आयआयटी दिल्ली येथे समाजातील आणि विविध स्थानिक समुदायांकडे असणारे पारंपारिक ज्ञान आणि क्लायमेट अॅक्शनसाठीचे (हवामान बदल आणि त्याच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्न) आधुनिक उपाय यांच्या समन्वयाचे महत्व अधोरेखित करणारे संशोधन करते आहे.
तुमुयोन खुलेन या मणिपूरमधील लहानशा गावात जन्माला आलेली एस.बी.ट्विएला ही तिच्या विज्ञान विषयातील वावराचं श्रेय मणिपूरच्या निसर्गाला देते. तिथल्या स्वच्छ मोकळ्या आकाशामुळे तिला अवकाशाची ओढ लागली असे ती म्हणते.
२०२४ च्या संयुक्त राष्ट्र विज्ञान परिषदेच्या व्यवस्थापन समितीचा ट्विएला ही भाग होती. जगभरातील दिग्गजांसमोर आपले संशोधन मांडण्याची संधी तिला मिळाली आणि त्याचे कौतुकही सर्वांकडून झाले.
लोकसत्ता चतुरंग २२.२.२५
(विज्ञानव्रती, रुचिरा सावंत यांचा लेख)