लवकरच भारतीय हवाई दलाचे रूपांतर अंतराळ सेनेत होणार!

SV    27-Feb-2025
Total Views |
 
      भारतीय वायुसेना भविष्यातील युद्धांमध्ये अधिक बलशाली होण्यासाठी मोठी तयारी करत आहे. संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीने हवाई दलाला 'स्वतंत्र, व्यावसायिक आणि सामरिक दल' बनवण्याचे काम हाती घेतले आहे. हवाई दल आता केवळ पाकिस्तान आणि चीनचा यांच्यावर लक्ष केंद्रित न करता आपली ताकद वाढवण्यावर भर देत आहे.  जेणेकरुन ड्रोनपासून ते उपग्रहापर्यंत सर्व अत्याधुनिक एरोस्पेस उपकरणांच्या मदतीने ते धोरणात्मक भूमिका बजावू शकतील.
      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या एअर फोर्स कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ही ब्लू प्रिंट सादर करण्यात आली होती. यामध्ये हवाई दलाचा रोडमॅप स्पष्ट करण्यात आला. संरक्षण सचिवांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्समध्ये समाविष्ट असलेल्या DRDO चे अध्यक्ष आणि संरक्षण उत्पादन सचिव यांचा समावेश असलेली ही समिती लवकरच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अहवाल सादर करणार आहे.

दैनिक भास्कर २३/०२/२५