फळे, भाज्या काढणीच्या पारंपरिक, आधुनिक यंत्रणा - भाग २

SV    28-Feb-2025
Total Views |
 
यांत्रिक काढणी
यात पारंपरिक साधनांपेक्षा अधिक कार्यक्षम अशा विविध उपकरणांचा समावेश असतो. यांत्रिक प्रणालीमध्ये फळांची  काढणी करताना हानी पोहोचू  नये यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केलेला असतो.
* झाडे हलविणारी यंत्रे (शेकर्स) - या यंत्रांच्या सहाय्याने  झाडांच्या खोडांना किंवा फांद्यांना नियंत्रित कंपन दिले जाते. त्यामुळे परिपक्व फळे खाली पडतात. या प्रक्रियेत झाडांचे नुकसान टाळण्यासाठी यंत्राचे योग्य आरेखन आणि कार्यपद्धती महत्वाची असते.
* हायड्रॉलिक लिफ्ट - हायड्रॉलिक लिफ्ट फळ तोडणीसाठी महत्वाचे उपकरण आहे, त्यामध्ये उचलला जाणारा प्लॅटफॉर्म आवश्यक त्या उंचीवर
नेऊन फळांची काढणी केली जाते. त्यामुळे अधिक उंचीवरील फळांची काढणी सुरक्षित, सोपी व जलद होते. ट्रॅक्टरला जोडून हायड्रॉलिक आर्म व आर्मच्या टोकाला फळ तोडण्यासाठी योग्य साधन जोडलेले असते. या लिफ्टला हायड्रॉलिक कन्व्हेअर बेल्ट जोडलेला असतो, त्यामुळे तोडलेली फळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेता येतात. 
* फायदे - उंच झाडांवरील फळं  सहज  काढता येतात. वेळ आणि मेहनतीची बचत होते. सुरक्षितता वाढते, कारण कामगारांना उंच झाडांवर चढावे लागत नाही. फळांची तोडणी व्यवस्थित व तंत्रशुद्ध होते.
* मर्यादा- हायड्रॉलिक मशिनची किंमत जास्त असून, देखभालीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची आवश्यकता असते.

अॅग्रोवन १५.२.२५