विज्ञान दिनाच्या निमित्ताने

SV    28-Feb-2025
Total Views |
 
२८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. आणि २०१५ पासून ११ फेब्रुवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दोनही दिवसांचे औचित्य साधून जाणून घेऊ  तीन महिला वैज्ञानिकांबद्दल :

उत्तर प्रदेशातील बरेली शहरातली प्रियांका दासगुप्ता 
दिल्लीमधून विज्ञान विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असताना प्रियांका वेगळे मार्ग शोधत राहिली. याच दरम्यान तिला 'विज्ञान संवाद' या क्षेत्राची ओळख झाली. 'फेम लॅब इंडिया', आणि 'युरेक्सेस इंडिया सायन्स स्लॅम' या वैज्ञानिकांसाठी आयोजित विज्ञान संवाद या विषयावरील संवाद अशा दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सहभाग तर घेतलाच तर त्यात ती जिंकलीसुद्धा! पुढे युरेक्सेस स्पर्धेची विजेती म्हणून युरोपियन रिसर्च कौन्सिलच्या बेल्जियम येथील मुख्यालयाला तिने भेट दिली. ही युरोपवारी तिच्यासाठी निर्णयात्मक ठरली.  कारण त्यानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर तसेच संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढे लगेचच तिने लंडनच्या विद्यापीठातून 'विज्ञान संवाद आणि पॉलिसी या विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली. आणि या विषयावर विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटरसारख्या अनेक महत्वाच्या संस्थांमध्ये काम केलं. सध्या ती इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (IEC) या संस्थेमध्ये असोसिएट प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. 

लोकसत्ता चतुरंग २२.२.२५   (विज्ञानव्रती, रुचिरा सावंत यांचा लेख)