मध्य प्रदेश सरकारने भगवान रामाचे पवित्र स्थान असलेल्या चित्रकूटला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना तयार केली आहे. रामायण काळाशी संबंधित ठिकाणे आणि शहरांमध्ये आधुनिक वाहतूक सेवा विकसित करण्यासाठी ७५० कोटी रुपये खर्च केले जातील. त्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे. संपूर्ण शहरात श्रीरामाची प्रतिमा असेल. या अंतर्गत ८० एकरांत रामायण अनुभव पार्क तयार करण्यात येणार असून, त्यात श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या भव्य मूर्ती असतील. रामायण काळातील ठिकाणांचे मॉडेल, ५D-३D होलोग्राम आणि लाईट-साउंड शो असतील. आधुनिक सुविधांकडेही लक्ष दिले जाणार आहे. याअंतर्गत मल्टी फॅसिलिटी सेंटर, ट्रॅफिक कमांड सेंटर, नवीन रस्ते, मंदाकिनी नदीवरील अतिरिक्त पूल आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
दैनिक भास्कर ०६/०१/२५