ओटावा : जागतिक स्तरावर भारताला बदनाम करण्याचे कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन टुडो यांचे षड्यंत्र जगासमोर उघड झाले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, असे कॅनडातील आयोगाने स्पष्ट केले आहे. निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, अशा प्रकारचा अहवाल कॅनडाच्या परराष्ट्र हस्तक्षेप समितीने सादर केला आहे.
यापूर्वी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय राजदूतांसह अनेक लोकांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी वारंवारपणे होता. आता, या कॅनेडियन समितीनेच सरकारचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. अहवालानुसार, कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये कोणत्याही परदेशी राष्ट्राशी निश्चित संबंध सिद्ध होऊ शकला नाही, असे सांगण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारताविरुद्ध विष ओकत होते. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. मात्र, कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील चारही आरोपींना जामीन मंजूर केला. आता या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
मुंबई तरुण भारत ३० १.२५