महिला उद्योजिकांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार

SV    04-Feb-2025
Total Views |
 

       पहिल्यांदाच उद्योग क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातीतील महिला उद्योजिकांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असल्याची  घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ती खूप फायदेशीर ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया महिला उद्योजिकांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पात महिला उद्योजिकांसाठी ठोस आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या असून, यामुळे उद्योग क्षेत्रात महिलांची संख्याही वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

      मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) कार्यकारी मंडळाच्या सदस्या ऋजुता जगताप म्हणाल्या,  महिलांना उद्योगासाठी निधी मिळत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोमहिलांना कर्ज मिळणार असल्याने अनेक महिला उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवतील, महिलांची संख्या उद्योग क्षेत्रात वाढेल आणि महिलांमध्ये उद्योगासाठीचा आत्मविश्वास वाढेल. अर्थसंकल्पात महिला उद्योजिकांच्या स्टार्टअप्सना चालना देण्यावर भर दिला आहे.


पुढारी ३.२.२५