चौंडीतील राष्ट्रीय परिषदेत ४०० महिला होणार सहभागी

SV    06-Feb-2025
Total Views |
 

पुणे"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जन्मवर्षानिमित चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी १ या वेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल, अशी माहिती 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे' चे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली.

देव पुढे म्हणाले, "२०२५ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्ताने 'लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समिती'द्वारे,  त्यांचे जन्मगाव चौडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिला सबलीकरणावर परिसंवाद घेण्यात येईल.


मुंबई तरुण भारत ५.२.२५