बांगलादेशी लुटारूंचा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला
SV 07-Feb-2025
Total Views |
कोलकाता- प.बंगालच्या दक्षिण दिनाजपुर सीमेवर चोरी करण्यासाठी अनेक बांगलादेशी मध्यरात्री भारतात घुसले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तलवारी आणि कट्यारी काढून हल्ला केला. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी जवानांनी गोळीबार केला असता त्यापैकी एक घुसखोर जखमी झाला. काही जवानही या घटनेत जखमी झाले आहेत. जखमी घुसखोराला पकडण्यात यश आले.
नवभारत ६.२.२५
.