४ पाकिस्तानी कमांडो आणि ६ अतिरेकी ठार

SV    09-Feb-2025
Total Views |
 
      जम्मू: जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रामध्ये नियंत्रणे रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या बॅट (बॉर्डर ॲक्शन टीम) तुकडीतील सैनिकांनी केलेला हल्ला भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला पाकिस्तानातून मध्यरात्रीनंतर भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १० जणांचा लष्कराने खात्मा केला. त्यामध्ये चार पाकिस्तानी सैनिकांचा तसेच सहा दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताला भारतीय लष्कराने दुजोरा दिलेला नाही.
      सूत्रांनी सांगितले की, पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरात घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत जवानांनी १० घुसखोरांचा खात्मा केला. पाकिस्तानने ५ फेब्रुवारी रोजी काश्मीर एकीकरण दिवस पाळला. त्या पार्श्वभूमीवर सीमेवरील एका चौकीवर बॅट तुकडीच्या जवानांनी हल्ला करण्याचे कारस्थान रचले होते.
      भारतीय लष्कराच्या गोळीबारात ठार झालेल्या १० जणांमधील सहा दहशतवादी हे अल-बद्र या संघटनेचे असावेत, असा लष्कराचा कयास आहे.
लोकमत ०८/०२/२५