रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेट्सनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अतिशय रोमहर्षक सामन्यात भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स होण्याचा बहुमान पटकावला. २००० साली केनियात झालेल्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारताला हरवून चॅम्पियनशिप मिळवली होती. त्या २५ वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला भारताने आता घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे या असामान्य कामगिरीबद्दल कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, 'एक असामान्य कामगिरी आणि त्याचा असामान्य निकाल ! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल क्रिकेट संघांचा अभिमान वाटतोय. त्यांनी पूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. शानदार खेळ केल्याबद्दल आपल्या संघाचे खूप खूप अभिनंदन!'
पुढारी १०/०३/२५