बुरखा घातल्याने प्रवेशास नकार

SV    04-Mar-2025
Total Views |
 
     पिंपरी : दहावीच्या परीक्षेला येताना एका विद्यार्थिनाने बुरखा घातल्याने शाळेने तिला परीक्षेसाठी प्रवेश नाकारला. पालक पोलिसांकडे गेले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर विद्यार्थिनीला परीक्षेला बसण्यास परवानगी दिली. मात्र, परीक्षेस बसू देणार नसल्याची भूमिका शाळेने घेतल्याचे  पालकांनी सांगितले.
बिजलीनगर , चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेकरिता निगडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केंद्र मिळाले आहे. तेथे ही घटना घडली.
      दहावीच्या परीक्षेला कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला प्रवेश द्यायचा नाही, याचा अधिकार शिक्षणाधिकारी व संबंधित परीक्षा केंद्रप्रमुख यांना आहे. आम्हाला तो अधिकार नाही. त्यामुळे तेच विद्यार्थिनीच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतील', असे निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस  निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सांगितले.
बुरखा घातला किंवा हिजाब घातला, तरी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनीची ओळख पटविणे अनिवार्य आहे. त्यामुळे पेपर लिहिताना त्या मुलीचा चेहरा दिसणे गरजेचे आहे. महापालिकेच्या उर्दू शाळेतील मुलीही हिजाब घालून परीक्षेला जातात.

महाराष्ट्र टाइम्स २.३.२५