महिम येथे सापडला राजा महादेवरायकालीन शिलालेख

SV    07-Mar-2025
Total Views |
 
          महिम (ता. सांगोला) येथे आजवर दुर्लक्षित असणाऱ्या शिलालेखाची उकल झाली आहे. या लेखाची शिळा स्वच्छ करून त्याचे ठसे घेण्यात आले. पुण्यातील इतिहास अभ्यासकांनी  त्याचे वाचन केले असता, हा तेराव्या शतकातील राजा महादेवराय यादवांचा शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे.
           शिलालेखात शके ११९१ असा कालोल्लेख आहे. यादव राजा महादेवाची प्रशस्ती आली आहे. पिल्ले जंत्रीनुसार त्याची तारीख ९ मे १२६९ अशी येते. महादेव राजाच्या काळातील एका मंदिरास २० गद्यान दानाची नोंद हा शिलालेखाचा मुख्य विषय आहे. त्याची भाषा संस्कृत आणि पुढे जुनी मराठी आहे. एकूण २२ ओळी आहेत. अठराव्या ओळीनंतरचा भाग फुटलेला असून, फुटलेल्या भागाचा शोधही लागला आहे. त्यात 'स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां..' अशी सुरुवात असणारे प्रसिद्ध शापवचन आलेले आहे. जिल्ह्यावर मध्ययुगीन काळात कल्याणीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी, अक्कलकोटचे शिलाहार, द्वारसमुद्रचे होयसळ, देवगिरीचे यादव इ. विविध राजघराण्यांची सत्ता होती. जिल्ह्याच्या राजकीय अभ्यासाच्या दृष्टीने हा शिलालेख महत्त्वाचा आहे. 

पुढारी १.३.२५