एम.बी.ए. झालेली भारतातील पहिली महिला सरपंच छवी राजावत

SV    08-Mar-2025
Total Views |
 
राजस्थानातील सरपंच छवी राजावत ही २०१० साली झालेल्या निवडणुकीत सर्वप्रथम निवडून आली. एम.बी.ए. झालेली भारतातील पहिली सर्वाधिक तरुण महिला म्हणून तिला ओळखले जाते. 

सोडा हे राजस्थान मधील टोंक जिल्ह्यातील, मालपुरा तालुक्यातील एक छोटंसं गाव. टोंक हा सर्वात मागासलेला जिल्हा, जयपूरपासून सुमारे ७८ किलोमीटर अंतरावर असलेला. छवीचा जन्म जयपूरमध्ये एका श्रीमंत आणि खानदानी घराण्यात झाला. छवीचं शालेय शिक्षण आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूलमध्ये आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज गर्ल्स स्कूल मध्ये झालं.

सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तिने आपल्या गावात अनेक घरांवर रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवली आहे. आणि घराघरांत शौचालये बांधून दिली आहेत. २५ मार्च २०११ ला न्यूयॉर्क येथे ११ वी इन्फोपॉवर्टी जागतिक परिषद भरली होती, त्या परिषदेत बोलण्याची संधी तिला मिळाली होती. तिच्या कार्यकाळात तिने मूलभूत सेवा, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रचार केला.

साप्ताहिक विवेक, १३ ते १९ जानेवारी २०२५