ओडिशाच्या आरती देवी केवळ तिच्या गावातील लोकांसाठी आणि देशभरातील ग्रामीण सरकारांसाठीच नव्हे तर भारत सरकारसाठी देखील प्रेरणास्थान आहेत. देशातील विविध प्रदेशातील गावकऱ्यांच्या, विशेषतः महिलांच्या उन्नतीसाठी अनेकांनी तिच्या कल्पना आणि दृष्टिकोनांचा अवलंब केला आहे.
आता, 'सर मॅडम सरपंच' हा बहुभाषिक चित्रपट ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील धुनकापाडा पंचायतीच्या माजी सरपंच आरती देवी यांच्या जीवनावर आणि कामगिरीवर आधारित आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आणि त्याचं खूप कौतुकही झालं. २०१२ मध्ये आरती देवी यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या हिताचं काम करण्यासाठी त्या गावच्या सरपंच झाल्या. आरती आयडीबीआय बँकेत गुंतवणूक अधिकारी होत्या. महिलांसाठी साक्षरता, लोककला पुनरुज्जीवित करून कारागिरांना पाठिंबा देणं आणि गावात सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस) सुलभ करणं यासारख्या कारणांसाठी पुढाकार घेतल्याने, आरती यांना २०१४ मध्ये राजीव गांधी नेतृत्व पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. २०१४ मध्ये ओबामा सरकारच्या काळात अमेरिकेत आंतरराष्ट्रीय अभ्यागत नेतृत्व कार्यक्रम (आयव्हीएलपी) मध्ये सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या त्या एकमेव भारतीय होत्या.
"माझ्या पंचायतीतील अश्या अनोख्या अंमलबजावणीमुळे इतर सरपंच, प्रशासन आणि सरकार प्रेरित होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता, माझ्या आयुष्यावरही चित्रपट बनवला जात आहे हे आश्चर्यकारक आहे," असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.
ओएमएमकॉम न्यूज