माहीत असावं असं काही

SV    08-Mar-2025
Total Views |
 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो. चीनमध्ये स्टेट काऊन्सिलच्या सल्ल्यानुसार अनेक महिलांना या दिवशी अर्ध्या दिवसाची सुटी दिली जाते.

जगभरात मोर्चेचर्चामैफिलीप्रदर्शनं आणि वादविवाद असे हजारो कार्यक्रम होतात.

२०२४ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फ्रान्सच्या राज्यघटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यात आले होते.

इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला "फेस्टा डेला डोना" म्हणतात. तिथं या दिवशी "मिमोसा ब्लॉसम" ही लोकप्रिय फुलं भेट म्हणून दिली जातात.

रशियात फुलांची विक्री साधारणपणे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आसपास दुप्पट होते.

     १९८४ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणाऱ्या युगांडामध्ये सरकार दरवर्षी एक वेगळी थीम निवडतं.

सर्बियाअल्बानियामॅसेडोनिया आणि उझबेकिस्तानसह काही देशांमध्ये मदर्स डे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन एकाच दिवशी साजरा करतात.

अमेरिकेत मार्च हा महिलांच्या इतिहासाचा (वुमन्स हिस्ट्री)महिना म्हणून साजरा केला जातो. अमेरिकन महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जारी करण्यात येणाऱ्या अध्यक्षीय घोषणेत महिलांचा गौरव करण्यात येतो.

मादागास्कर आणि नेपाळमध्येही या दिवशी महिलांसाठी अधिकृत सुट्टी असते.

आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी रंग आणि थीम 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाइटनुसार जांभळाहिरवा आणि पांढरा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत.

त्यात म्हटलं आहे की, "जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतिक आहेहिरवा रंग आशेचं प्रतीक आहे तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो."

 

बीबीसी मराठी ७.३.२५.