आपणात राष्ट्रीयत्व उत्पन्न करून हिंदू हे एकराष्ट्रीय आहेत व हिंदू समाजाशी निगडीत असे त्यांचे संबंध आहेत, हे शास्त्रीय दृष्ट्या समजून घेऊन प्रत्यक्ष कामाला लागावयाचे आहे. राष्ट्ररुपी व समाजरूपी विराट पुरुषाचे कल्याण हेच आपले ध्येय आहे. ज्याप्रमाणे हाताचे बोट शरीरापासून अलग केले असता स्वतंत्रपणे वावरू शकत नाही, त्याप्रमाणे व्यक्तींचेही आहे. शरीराच्या अंताप्रमाणेच जर एखादी व्यक्ती समाजापासून अलग राहू लागली, तर ती मृतवत बनेल. समाजावाचून व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, म्हणून समाज सुखी असेल तर ती व्यक्ती सुखी, ही भावना ठेवून आपण आपल्या हिंदू समाजाच्या संरक्षणाच्या कार्यास झपाट्याने सुरवात केली तर याचि देही याचि डोळा तो परमभाग्याचा दिवस आपण पाहू शकू.
- डॉ. हेडगेवार