२२ जानेवारी ही अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येते आहे तशी तयारीही जोरात सुरू आहे. मंदिराला नक्षीदार दरवाजे लावण्याचे काम सुरु आहे. दरवाजांच्या नक्षीत विष्णू कमल आहे, वैभवाचे प्रतिक गजराज आहे आणि प्रणाम मुद्रेत देवीचे चित्र आहे. हे नक्षीदार दरवाजे सागवानाच्या प्राचीन वृक्षापासून बनवले आहेत. रामंदिराच्या सिंहद्वार प्रवेश मार्गावरील पायऱ्या संगमरवरी आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी ‘जय श्रीराम’ लिहिलेल्या विटांचा उपयोग केला आहे. २२ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून रामलल्लाचे दर्शन सगळ्या भक्तांना घेता येईल. हे मंदिर वास्तुकलेचा एक चमत्कार असून भारत आणि जगातील सगळ्यात मोठे मंदिर असेल.
भारत समाचार २९.९.२३