विवेकचा ‘उमर’ झाला, ८ वर्षांनी मुझफ्फरनगरमध्ये सापडला

25 Dec 2023 10:19:49
 
      आठ वर्षांचा विवेक आई वडिलांबरोबर चंडीगडमध्ये रहात होता. आईवडील मजुरी करायचे.एक दिवस शाळेत जायला निघालेला विवेक घरी परत आलाच नाही. १७ मार्च २०१६ या दिवशी तो हरवल्याची तक्रार चंडीगड इथल्या पोलीस ठाण्यात करण्यात आली. आठ वर्षांनी तो मुझफ्फरनगर मध्ये सापडला तेव्हा ‘उमर’ झालेला होता, त्याची सुंताही केलेली होती. सहारणपूर इथल्या मदरशात त्याचे धर्मांतर करण्यात आले. नावही बदलण्यात आले.
      ४ ऑक्टोबर २०२३ रोजी मुझफ्फरनगर इथे मतलूब नावाची व्यक्ती आपल्या मुलाचा आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी त्याला आधार कार्ड सेंटरवर घेऊन गेली. त्या आधार कार्डावर मुलाचे नाव विवेक, वडिलांचे नाव वीरेंद्रकुमार आणि गाव चंडीगड असे लिहिलेले होते. संशय आल्याने सेंटरवरील व्यक्तीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी विवेकला ताब्यात घेऊन तपास केल्यावर हा प्रकार समोर आला. ज्या मदरशात विवेकचे धर्मांतर झाले तेथील मौलवी आणि सरपंच अफसरूल हे दोघे, मतलूब आणि मौलाना जमाल यांच्यावर अपहरण आणि धर्मांतराचा आरोप आहे.
      विवेकला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले असून त्याला अपहरणाचा तपशील आठवत नाही. धर्मांतर झाल्यानंतरचे सर्व आठवत असून ‘आपण आता म्हशीचे मांस खातो’ असे त्याने सांगितले. विवेकचे धर्मांतर करून त्याला मदरशात डांबून ठेवले होते.
ऑप इंडीया १.११.२३ 
Powered By Sangraha 9.0