बलवान शरीर व तर-तम बुद्धी

26 Dec 2023 10:26:31
 
 आपण इतके बलसंपन्न असले पाहिजे की, कोणीही आपणास धमकावू शकणार नाही; नमवू शकणार नाही. त्यासाठी शरीर निरोगी व दणकट असणे आवश्यक आहे. मनुष्यरूप धारण करून आलेले आपल्याकडचे सर्व ईश्वरी अवतार असेच होते. सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू, हेच आपल्या सर्व धर्मग्रंथांचे सार आहे. स्वामी विवेकानंद म्हणत, ‘लोखंडी स्नायू आणि पोलादी नसा असलेली माणसे मला पाहिजेत’. ते स्वत: तसे होते. आपले काही गुरुबंधू नेहमी मुळूमुळू रडत बसलेले पाहून ते गर्जून म्हणत, ‘ही शक्ती नव्हे, हा तर  निव्वळ दुबळेपणा आहे. लहान मुलींप्रमाणे रडत काय बसता?’ जीवनातील कर्तव्ये पार पाडण्याचे शरीर हेच प्रधान साधन आहे. ईश्वरप्राप्तीसाठीही निरामय आणि बलवान शरीर आवश्यक आहे.
नित्यप्रेरणा/ प.पू.गुरुजी


Powered By Sangraha 9.0