जसजशी प्राणप्रतिष्ठा जवळ येतेय तसतसा प्रभूरामाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांचा उत्साह वाढतोच आहे. यातही मोठा आहे तो युवा वर्ग. सनातन संस्कृतीशी हा वर्ग जोडला जातोय. एका दिवसात लाखो भक्तांनी दर्शन घेण्याची नोंद गेल्या वर्षभरात अनेकदा झाली. १ जानेवारी २०२३ हा रोमन वर्षाचा पहिला दिवस. १,१२,८२४ भक्तांनी यादिवशी दर्शन घेतले. हा विक्रमच होता. मार्च महिन्यात रामनवमीच्या दिवशी नवा विक्रम झाला. एकूण १,२६,३१२ भक्त यादिवशी दर्शनास आले. पुन्हा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी १,४६,१८९...आधीचे विक्रम मोडले जाऊन नवे विक्रम प्रस्थापित होताहेत! दिवाळीत दीपोत्सव साजरा करतानाही हेच दृश्य पाहायला मिळाले. जो युवावर्ग १ जानेवारी हा दिवस देशभरात पब आणि हॉटेलमध्ये जाऊन साजरा करतो त्याच युवावर्गाने नवीन वर्षाचा पहिला दिवस श्रीरामांचे दर्शन घेऊन साजरा केला, याला आपण योगायोग म्हणायचे की सनातन धर्माबद्दल युवकांना वाटणारे आकर्षण म्हणायचे ? गर्दीचे विक्रम प्रस्थापित होताहेत आणि मोडले जाताहेत; हे आश्चर्यजनक आहे.
News Uttar Pradesh १/१२/२३