अयोध्येतील भव्य राम मंदिराला साजेसेच पूजा-अर्चा करणारे पुजारीही तेथील परंपरा आणि पूजा पद्धतीचे विश्वनायक असतील. त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. योग्य अर्जदारांचा शोध घेऊन एकूण २० जणांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. रामंदिराच्या जवळच रामकोट इथे त्यांचे प्रशिक्षण होईल.
नित्याराधना, योग व्यायाम, पाठ्यचर्या याखेरीज मानसिक विकासावर आधारित एक विशेष सत्र रोज असेल. प्रशिक्षक आचार्यांची यादी तयार असून मुख्य आचार्य अयोध्येचे आहेत. या भावी पुजाऱ्यांना आवश्यकतेनुसार विविध भाषा, संवाद कौशल्य, संपूर्ण पूजा पद्धती यात प्राविण्य मिळवण्यासाठी देशभरातील विख्यात तज्ज्ञ शिक्षण देतील.
एकूण ३००० अर्जांपैकी २५० अर्ज निवडण्यात आले. देशातील विविध प्रांतांमधून अर्ज आले. उपसमितीच्या सदस्यांनी पारख करुन २० जणांची निवड केली. त्यांचे प्रशिक्षण सहा महिने होणार असून ते डिसेंबर महिन्यात सुरु होईल.
प्रशिक्षित पुजाऱ्यांची ठराविक दिनचर्या असेल. सकाळी ध्यान, योग, जप यासाठी ठराविक वेळ असेल. रामलल्लाच्या भूपाळीपासून शेजारतीपर्यंत सगळे पूजाविधी त्यांना प्रशिक्षणा दरम्यान शिकवले जातील. या उपसमितीचे सदस्य महंत मिथिलेश नंदिनी शरण म्हणाले, “प्रशिक्षणानंतर परीक्षा घेऊन पुजारी निवडले जातील.”
जागरण न्यूज २/१२/२३