हा प्रकार प्रयागराज जिल्ह्यात यमुना तीरापलीकडे असलेल्या औद्योगिक क्षेत्रात घडला. एक इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांना घेऊन करछनाच्या दिशेने निघाली होती. या बसचे ड्रायव्हर मंगलप्रसाद यादव हे होते तर कंडक्टर म्हणून २४ वर्षीय हरकेश विश्वकर्मा हे काम करीत होते. या बसमधून युनायटेड इंजिनियरिंग कॉलेजमधील बी-टेक फास्ट ईयरचा २० वर्षीय विद्यार्थी लारेब हाशमी हा प्रवास करीत होता. बस सुरु झाल्यानंतर थोड्यावेळाने कंडक्टरने हाशमीकडे तिकिटासाठी पैसे मागितले. बसचे ड्रायव्हर मंगलप्रसाद यांच्या म्हणण्यानुसार भाड्याचे पैसे कमी दिले यावरून हाशमी आणि कंडक्टर यांच्यात बचाबाचीला सुरुवात झाली.
काही वेळ हा वादविवाद चालू होता तोपर्यंत बस कॉलेजच्या गेटपर्यंत पोहचली. उतरण्यापूर्वी हाशमीने आपल्या बॅगेत लपवलेला चॉपर ( धारधार हत्यार ) काढला आणि कंडक्टर हरकेशवर वार केला. त्या वाराने कंडक्टरचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सारे प्रवासी गडबडून गेले. काही समजण्यापूर्वीच हाशमी कॉलेजमध्ये पळून गेला. बस कंडक्टरला काही प्रवाशांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती केले. हरकेशची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर प्रयागराज हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहेत.
पोलिसांनी हाश्मीला चांडी बंदरगाह जवळ अटक केली. त्यानंतर त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चॉपर जप्त करण्यासाठी त्याला नेत असताना त्याने लपवून ठेवलेल्या बंदुकीने पोलिसांवर हल्ला केला. पोलीस सावध असल्यामुळे कोणाला दुखापत झाली नाही. आत्मरक्षणासाठी पोलिसांनी फायरिंग केले. त्यात हाशमीच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला. आता त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत.
या घटनेनंतर एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे; जो आरोपी लारेब हाशमीचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओत इस्लामी वेशातील माणूस आपण केलेल्या हल्ल्याचे कारण इस्लामचा झालेला अपमान असल्याचे सांगत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हाशमी म्हणतो, ''वो मुसलमानों को गाली दे रहा था। अल्लाह ताला, अन्हु की बरकत से मैंने उस हरामजादे को मारा है। इंशाअल्लाह वो बचेगा नहीं। इंशाअल्लाह वो मरेगा।”
त्या व्हिडीओत तो पुढे म्हणतो, “यहाँ से फनाज तक, पूरी दुनिया तक ये गरीब नवाज की दर का कुत्ता पैगाम दे रहा कि जिसने हुजूर के खिलाफ बात की है, लब्बैक या रसूलअल्लाह हम जिएँगे आपके लिए, मरेंगे आपके लिए। इंशाअल्लाह मार देंगे। तो ये रसम है कि हुकूमत मोदी की है योगी की है, नहीं हमारे दिलों पर राज सिर्फ मुस्तफा का चलता है। इंशाअल्लाह अंतरिम मारेंगे।”
पोलीस उपायुक्त यमुनापार यांच्या म्हणण्यानुसार याबाबत तपास चालू आहे. लारेब हा मुळचा प्रयागराजच्या सोराव भागातील आहे व त्याच्या वडिलांचा व्यवसाय हा कोंबड्या विकण्याचा आहे.
ऑपइंडिया स्टाफ २५.११.२३