शाळेत घुसून केला विद्यार्थिनींचा विनयभंग

08 Jan 2024 10:33:31
 
 झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील आरबी हायस्कूलमध्ये घुसून विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, मुस्लिम समाजातील लोकांनी शाळेत घुसून विद्यार्थिनींचा विनयभंग केला, धार्मिक घोषणा देण्याची त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्यांनी लाठ्या काठ्यांनी मारझोड केली व दगडफेकही केली. या हल्ल्यात २० ते २५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले.
या घटनेच्या विरोधात जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी रामगड मधील रजरप्पा पोलीस स्टेशनला  घेराव घातला. विद्यार्थ्यांनी मुस्लिम समाजातील आठ जणांसह अनेक अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बाबूलाल मरांडी हे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हणाले की,  “शालेय विद्यार्थिनींचा सुनियोजितरीत्या विनयभंग करणे व त्याला विरोध करणाऱ्यांना मारहाण करणे ही निश्चितच हैराण करणारी घटना आहे. राज्यातील हेमंत सोरेन सरकार धर्माच्या नावाखाली गुंडांचे आणि गुन्हेगारांचे समर्थन करीत आहे का ? मुलींना शाळेत जायला आता भीती वाटत आहे. सरकारला झारखंड नेमका कोठे नेऊन ठेवायचा आहे? ”                
    नवभारत टाइम्स २५.११.२०२३

  
Powered By Sangraha 9.0