बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता इस्लामी धर्मांध जमावाने हिंसक आंदोलन करून संपुष्टात आणली. शेख हसीना यांनी स्वतः पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारताचा आश्रय घेतला. सुरुवातीला सरकार विरोधी आंदोलन म्हणून सुरू झाले होते त्या आंदोलनाचे रुपांतर नंतर मात्र हिंदू विरोधी हिंसक आंदोलनात झाले. या हिंदू विरोधी हिंसक आंदोलनात मंदिरांची तोडफोड केली जात आहे, सार्वजनिकरीत्या हिंदुंची हत्या केली जात आहे. हिंदू महिलांवर बलात्कार होत आहेत व इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदुंची घरे लुटली जात आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे ते कसे योग्य हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील मिडिया पुढे सरसावला आहे.
बांगलादेशात हिंदुंची होत आहे कत्तल
बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसक आंदोलनात सातत्याने घडत असलेल्या हिंसक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यात हिंदू महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि जमावाने तिचे दागिने ही लुटले, याची कहाणी ती महिला स्वतः सांगत आहे. एका महिलेने सांगितले की, “ रात्री ते लोक आले. त्यांनी आमच्या घराची तोडफोड केली आणि सगळे काही लुटून नेले. त्या वेळी आम्ही लपून राहिलो म्हणून वाचलो पण माझी जाऊ मात्र त्यांच्या हाती सापडली. त्यांनी तिला दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.”
बांगलादेशातील खुलनामधील एक मंदिर धर्मांधांनी पेटवून दिले आणि मंदिरातील मूर्ती फोडली. खुलनातील आणखी एका कालीमंदिराचे असेच नुकसान केले. देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरांना लक्ष करण्यात आले होते. काही ठिकाणी मूर्ती फोडल्या, आगी लावल्या तर काही ठिकाणची मंदिरेच पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
इस्लामिक धर्मांध हिंदुंची वेचून हत्या करीत आहेत. हसीना यांच्या सरकारमध्ये असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांची तर भर रस्त्यात हत्या केली जात आहे. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याची त्या धर्मांधांनी अमानुषपणे हत्या केली. पोलीस अधिकारी संतोष साहा याच्या विद्रूप केलेल्या प्रेताचे फोटो समोर आले आहेत. एका हिंदू पत्रकाराची तसेच एका नगरसेवकाची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली आहे.
हिंदुंचे हत्याकांड आणि त्यावर मिडीयाचे पांघरूण
बांगलादेशात हिंदू महिलांवर बलात्कार होत आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, सार्वजनिक ठिकाणी हत्या होत आहेत आणि या सगळ्यावर मिडीया मात्र पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे. सतत भारत आणि हिंदू विरोधी भूमिका घेणारा मिडीया याबाबतीत मात्र हिंदुंची होत असलेली कत्तल कशी योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी वर्तमानपत्रातील रकानेच्या रकाने भरले जात आहेत.
अमेरिकेतील वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स, हिंदुंची होत असलेली हत्या हा मुसलमानांचा बदला आहे असे सांगत आहे तर भारतातील डाव्या विचारसरणीचा मिडीया पोर्टर स्क्रॅाल सांगत आहे की, बांगलादेशात हिंदुंची जी हिंसा होत आहे त्याला भारतातील हिंदू जबाबदार आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, सुरुवातीला हिंदुंनी इस्लामिक धर्मांधांवर अन्याय केला म्हणून धर्मांधांनी त्याचा बदला घेतला. आपल्या लेखाच्या मथळ्यात ते लिहितात, ‘पंतप्रधान हसीना यांच्या राजीनाम्यानंतर हिंदुंचा बदला घेण्यास सुरुवात झाली.’ न्यूयॉर्क टाइम्सला सांगायचे आहे की, हिंदुंवर हल्ला ते हिंदू आहेत म्हणून झालेला नाही किंवा धर्मांध हे मुसलमान होते म्हणूनही झालेला नाही तर हिंदू हे शेख हसीना सरकारचे समर्थक होते म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याचा अर्थ न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार हिंदुंवर जे हल्ले झाले ते त्याच्या धर्मामुळे झाले नाहीत तर त्यांच्या राजकीय समर्थनामुळे झाले आहेत. या बातमीमुळे सोशल मिडीयावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सोशल मिडीयावर अभिनव अग्रवाल लिहितात की, ‘जर कुणाला नरसंहार झाकायचा असेल, नरसंहाराला लपवायचे असेल, मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्याला वाचवायचे असेल तर त्याने कुविख्यात न्यूयॉर्क टाइम्सवर डोळे झाकून विश्वास ठेवावा.’ लोकांच्या येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियांमुळे न्यूयॉर्क टाइम्सने लेखाचा मथळा बदलला, त्यातील बदला घेतला हा मुद्दा वगळला व केवळ हिंदुंवर हल्ला एवढेच शब्द ठेवले. मथळा बदलला असला तरी त्या लेखात सांगण्यात आलेल्या भूमिकेत मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नव्हता, तो तसाच हिंदू विरोधी ठेवला.
भारतातील डाव्या विचाराच्या पोर्टर स्क्रॅालमधील लेखात बांगलादेशातील हिंसाचाराला भारतातील हिंदूच जबाबदार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्क्रॅालच्या ८ ऑगस्टच्या अंकात नीलाद्री चटर्जी, मुहम्मद असिफुल आणि एरील्ड एनजेल्सन यांनी लेख लिहिला आहे.
त्याला लेखात ते लिहितात, 'सत्ताधारी पक्षाला सत्तेतून उखडून फेकल्यानंतरसुद्धा हुकुमशाही अवामी लीग सरकारवर असलेला संताप हिंसक रूपाने व्यक्त होत राहिला. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण कोणत्याही बंडानंतर हिंसक घटना या घडतच असतात. त्याला बांगलादेश तरी कसा अपवाद असणार? स्क्रॅालच्या म्हणण्यानुसार सत्ता पालटल्यानंतर हिंसा ही होतच असते ही सामान्य बाब आहे. त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. हिंसा होणे हे कसे स्वाभाविक असते हे पटवल्यानंतर स्क्रॅालने त्याचे खापर भारतातील हिंदुंच्या डोक्यावर फोडले. स्क्रॅालचे असे म्हणणे आहे की,भारतातील मिडीयाने बांगलादेशात होत असेलेल्या हिंदुंच्या विरोधातील हिंसक घटनांच्या बातम्या प्रसारित करून परिस्थिती बिघडवली. याचा अर्थ इस्लामिक धर्मांध आणि जमातची माणसे जे करीत आहेत त्याला भारतातील हिंदू जबाबदार आहेत. इतके सांगूनसुद्धा स्क्रॅालचे मन तृप्त झाले नाही, तेव्हा त्यांनी हेही सांगितले की, हे जे धर्मांध आहेत ती चांगली माणसे आहेत पण भारतात मात्र त्यांचे चुकीचे चित्र दाखवले जात आहे. त्यासाठी मंदिराबाहेर मुसलमानांनी मानवी साखळी बनवली होती याचे उदाहरण दिले आहे. स्क्रॅालला यातून अखेर काय सांगायचे आहे ? तर हिंसा ही होतच असते त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. त्यामुळे बांगलादेशात होत असलेली हिंसा काही वेगळी बाब नाही, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुंवर होत असलेले हल्ले हे धार्मिक कारणामुळे होत नाहीत तर हिंदुंनी आवामी लीगला पाठींबा दिल्यामुळे होत आहेत. त्यात त्यांनी असेही सांगून टाकले की, त्या जमावाला लुटालूट करायची होती म्हणून त्यांनी हल्ले केले, इतकेच.
बांगलादेशात असा हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना दडपून टाकल्या आणि हिंदुंनाच उलट दोषी ठरवण्यात आले, पण ही बाब नवी नाही. यापूर्वी असे अनेक वेळा असे झाले आहे. २०२३ मध्ये हरियाणातील नूंहमध्ये हिंदुंच्या यात्रेवर मुसलमानांनी हल्ला केला मात्र डाव्या विचाराच्या मिडीयाने त्याचा दोष हिंदुंच्या माथी थोपला. त्याचे असे म्हणणे होते की, हिंदू तेथे देवाला जलाभिषेक करायला आले होते. देवाला असा जलाभिषेक करणे चुकीचे आहे कारण ते क्षेत्र मुसलमानांचे आहे. म्हणून मुसलमानांनी हिंदुंवर हल्ला केला.
आजपर्यंत हिंदुंना सतत दडपण्यात आले आहे आणि असेच दडपले जाणार आहे. जोपर्यंत हिंदुंना आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आहे.
अर्पित त्रिपाठी, ऑपइंडिया ८.८.२४