फाळणीच्या वेळी काँग्रेस मंत्र्यांनी मागितली होती संघाची मदत

SV    26-Oct-2024
Total Views |
 
      काँग्रेसने आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याची संधी कधीही सोडली नाही. परंतु हेही तितकेच खरे आहे की, अडचणीच्या वेळी संघच नेहरू सरकारच्या मदतीला धावून गेला होता. ही घटना १९४७ ची आहे. फाळणीच्या आगीत देश होरपळून निघाला होता. हिंदू आणि शीख महिलांचे अपहरण होत होते, त्यावेळी तत्कालीन सुरक्षा मंत्री सरदार बलदेव सिंह यांनी गृहमंत्री असलेल्या सरदार पटेल यांना पत्र लिहिले होते. ज्यात त्यांनी संघाची मदत घेण्याबाबत सुचवले होते. त्या पत्राची एक प्रत त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाही पाठवली होती.
       या पत्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे, नेहरू यांच्या मंत्रिमंडळात असूनही सरदार बलदेव सिंह यांनी संघाची मदत घेण्याबाबत सुचवले होते. हे पत्र लिहीपर्यंत पश्चिम पंजाबमधून २० हजार महिला व मुलींचे अपहरण झालेले होते. असे सांगितले जाते की, संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी पाकिस्तानात घुसून लोकांची मदत केली व अनेकांचे जीव वाचवले. या पत्राची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा चालू आहे. याचे कारण मोदी सरकारने संघावरील बंदी उठवली आहे, जी ५८ वर्षांपूर्वी कॉंग्रेस सरकारने घातली होती.
या पत्रात सरदार बलदेव सिंह यांनी पश्चिम पंजाबमध्ये गैर मुसलमान लोकांबाबत चिंता व्यक्त केली व सरदार वल्लभ पटेल यांना स्पष्टपणे सांगितले की, पश्चिम पंजाबमधील शहर तसेच गावातील असे एकही ठिकाण नाही की जेथे महिलांवर अत्याचार झाले नाहीत, मुलींचे अपहरण झाले नाही. त्यांनी त्या पत्रात मुलींना वाचवण्यासाठी मुद्दे सुचवले होते. सर्वात प्रथम रेस्क्यू अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. त्यांना आपले काम पूर्ण करण्यासाठी पोलीस किंवा मिलीट्रीची आवश्यकता असेल ती ही देण्यात यावी.
त्या पत्रात त्यांनी गुप्तहेर खात्याचाही उल्लेख केला होता. ते म्हणतात की, त्या भागात काही उत्साही तरुण आहेत, ते हेर म्हणून काम करण्यासाठी मुसलमान  बनायला तयार आहेत. कारण हाच एकमेव मार्ग आहे की, ज्यामुळे आपल्याला खरी माहिती मिळू शकते. त्या पत्रात सरदार बलदेव सिंह पुढे म्हणता की, अशा तरुणांची                मदत घेण्यास आढेवेढे घेऊ नयेत, कारण यांच्यामुळेच आपल्याला वस्तुस्थिती समजणार आहे. त्याच पत्रात ते पुढे म्हणतात की, या कामासाठी संघातील लोकांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देईल. त्यासाठी संघ प्रमुख गोळवलकर यांच्याशी चर्चा करता येईल.  
त्या पत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या पत्राखाली तत्कालीन सुरक्षा मंत्री सरदार बलदेव सिंह यांची स्वाक्षरीसुद्धा आहे. हे पत्र गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना लिहिले असले तरी त्या पत्राची एक प्रत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाही पाठवली आहे.
याचा अर्थ असा समजण्याचे कारण नाही की, हे पत्र लिहिण्याअगोदर संघ स्वयंसेवक हातावर हात ठेवून शांतपणे बसले होते. त्यांनी यापूर्वीच पाकिस्तानात अडकलेल्या लोकांची मदत करायला सुरुवात केली होती. कदाचित याचमुळे अडचणीच्या वेळी मदतीला कोण धावून येईल हे सुरक्षा मंत्र्यांना लक्षात आले असेल. लाहोरमधील इंग्रजीचे प्राध्यापक ए.एन.बाली यांचे १९४९ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक ‘ नाऊ इट कॅन बी टोल्ड ‘ त्यात त्यांनी लिहिले आहे की, संघाच्या स्वयंसेवकांनी त्या भागात असलेल्या प्रत्येक मोहल्ल्यातील हिंदू, शीख महिलांना आणि मुलांना भयानक परिस्थितीतून बाहेर काढून कसे सुरक्षित केंद्रांवर पोहचवले. हिंदू व शिखांना भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांपर्यंत जाण्यासाठी ट्रक आणि बसेसची व्यवस्था केली व त्यांच्या रक्षणाचीही जबाबदारी घेत्तली. हिंदू व शीख असलेल्या भागात चौक्या उभारण्यात आल्या होत्या व हल्ला झाला तर दोन हात कसे करायचे याची माहिती दिली जात होती. एवढेच नाही तर पंजाबमधील अनेक जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांनी सुद्धा आपल्या परिवाराला व नातेवाईकांना वाचवण्यासाठी संघाची मदत घेतली होती. त्यानंतर तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ११ ऑगस्ट १९४८ संघाचे द्वितीय सरसंघचालक मा.स. गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संकट काळात हिंदू समाजाची सेवा केली. संघाच्या तरुणांनी महिला व मुलांचे रक्षण तर केले पण त्यांच्यासाठी बरेच काही केले आहे.’                                                                                    

 
ऑपइंडिया स्टाफ़ २३. ७. २०२४