रणथंबोरचे त्रिनेत्र श्रीगणेश मंदिर

SV    13-Nov-2024
Total Views |
 
      राजस्थानमधील रणथंबोर पर्वतावरील त्रिनेत्र श्रीगणेश मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध असे मंदिर आहे. जगातील हे एकमात्र असे मंदिर आहे ज्याठिकाणी दरवर्षी करोडोंच्या संख्येने पत्रे आणि निमंत्रण पत्रिका येतात. भगवान श्रीगणेशाला येणारी पत्रे ही 'रणथंबोर श्रीगणेशजी' असा पत्ता लिहून पाठवलेली असतात. पोस्टमन अत्यंत श्रद्धेने आणि आदराने पत्रे पोचती करतात. ती पत्रे मंदिरातील पुजारी भगवान त्रिनेत्र श्रीगणेशाला वाचून दाखवतात. भगवान त्रिनेत्र श्रीगणेश यांना निमंत्रण पाठवल्यावर प्रत्येक कार्य हे निर्विघ्नपणे पूर्ण होते असा लोकांचा असा विश्वास आहे. जगातील हे एकमेव गणेश मंदिर आहे, ज्या ठिकाणी श्रीगणेशाचे त्रिनेत्र असलेले रूप विराजमान आहे. एवढेच नाही तर गणपती बाप्पा मंदिरात आपल्या संपूर्ण कुटुंबासह म्हणजे दोन पत्नी रिद्धी- सिद्धी तसेच दोन पुत्र शुभ लाभ यांच्याबरोबर उपस्थित आहेत
'गजवदनम चितयम' नामक ग्रंथात गणपतीच्या तिसऱ्या नेत्राचे वर्णन आहे. भगवान शंकराने आपला तिसरा डोळा  उत्तराधिकारी म्हणून गणपतीला दिला होता. त्यामुळे भगवान महादेवाच्या समस्त शक्ती गजाननामध्ये विलीन झाल्या आणि ते त्रिनेत्री बनले. हे मंदिर १५७९ फूट उंचीवर आरवली आणि विंध्य  पर्वतरांगेत आहे.

 अमर उजाला, २२.१.२१