देशभर गाजलेल्या अजमेर सेक्स स्कँडल-प्रकरणाचा नुकताच न्यायालयात निकाल लागला आहे. अजमेर युवक कॉंग्रेसचा तत्कालीन अध्यक्ष फारुख चिश्ती, उपाध्यक्ष नफीस चिश्ती, सहसचिव अन्वर चिश्ती ( तिघेही अजमेर दर्गा व्यवस्थापनाशी संबंधित) यांनी मिळून एका हिंदू व्यावसायिकाच्या मुलाशी मैत्री केली. त्याच्या मैत्रिणीला फार्मवर बोलावून तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्या मुलीचे अश्लील फोटो काढले. नंतर या मुलीला ब्लॅकमेल करून इतर मुलींना आणण्यास भाग पाडले. ज्या फोटोग्राफरने ते फोटो डेव्हलप केले त्याने ते झेरॉक्स करून विकले.
एकूण १०० हून अधिक महाविद्यालयीन मुलींवर सामुहिक बलात्कार करण्यात आले,त्यापैकी सहा दुर्दैवी मुलींनी आत्महत्या केली होती. पिडीत मुली हिंदू समाजातील व गुन्हेगार मुसलमान असल्याने हे ठरवून केल्याची तेव्हा चर्चा झाली. केवळ १७ मुलींनी धीराने तक्रार केली. १९९२ साली घडलेल्या या प्रकरणाचे आरोपपत्र २००१ साली सादर झाले.
विशेष पोक्सो न्यायालयाने या सहाजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंडही भरायचा आहे. या प्रकरणात एकूण १८ जण होते. चार जणांना आधीच शिक्षा झाली आहे. चार जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली तर एक जण फरार आहे. अजमेरच्या प्रसिद्ध दर्ग्याचे सेवेकरी ‘प्रभावशाली आणि राजकीयदृष्ट्या वजनदार’ खादीम परिवाराशी गुन्हेगारांचा संबंध असल्याने गुन्हा बाहेर येण्यास, खटला उभा राहण्यास आणि तो चालण्यात प्रचंड अडचणी आल्या. अखेर ३२ वर्षांनी निकाला लागला!
पुढारी २१.८.२४