'अग्निपंख' पुस्तक हे आपले माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचे चरित्र आहे. एस.एल.व्ही-३ च्या अयशस्वी उड्डाणानंतर ते खूपच निराश झाले होते, त्यानंतर त्यांच्या प्रमुखांनी त्यांच्यावर पुढील जबाबदारी सोपवली. त्याबद्दल डॉ. कलाम म्हणतात, 'शिखराकडे जायचं हे खरं असलं तरी जीवन आजूबाजूलाच फुललेलं असतं शिखरावर नव्हे ! आपण अनुभवसमृद्ध होतो , नवीन तंत्रज्ञान शिकतो आणि त्या बळावर आपला शिखराकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होत जातो. त्या प्रवासाची धुंदी जो अनुभवेल तोच शिखरावर समाधानानं पोचेल !'
आजचे पसायदान- अनघा लवळेकर