हिंदुंनो ! सावध राहून मतदान करा !

13 Dec 2024 11:01:53
 
 देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशात होत असलेल्या लोकसंख्येतील बदलावर फार गंभीर चिता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “देशातील काही भागातील लोकसंख्येत झपाट्याने बदल झाला आहे आणि तो भाग राजकीयदृष्ट्या एक किल्ला बनला आहे. त्याठिकाणच्या निवडणुका आणि लोकशाहीचे महत्त्व संपुष्टात आले आहे कारण तेथील निवडणुकीचा निर्णय हा आधीच निश्चित झालेला असतो.” राजस्थान राज्याची राजधानी जयपुरमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या एका संमेलनात ते बोलत असताना ते म्हणाले की, “लोकसंख्येतील होत असलेला बदल हे जगासाठी फार मोठे आव्हान आहे. देशातील काही भागात लोकसंख्येतील परिवर्तन फार झपाट्याने होताना दिसत आहे. अशा भागात आता निवडणुकीला काहीही अर्थ राहिलेला नाही कारण तिथून कोण निवडून येणार हे अगोदरच ठरलेले असते.”
उपराष्ट्रपती म्हणाले की, “ज्या भागात अशा प्रकारे लोकसंख्या सतत वाढत आहे त्या भागातील हिंदू जनतेला याची जाणीव होणे गरजेचे आहे.” पुढे ते म्हणाले की, “आम्ही आपल्या पूर्वजांचे ऋणी आहोत कारण त्यांनी आम्हाला श्रेष्ठ संस्कृती आणि परंपरा दिली आहे. त्यांनी दिलेली ५००० वर्षांपासून चालत आलेली परंपरा, त्याचे तत्वज्ञान, त्याची महानता, त्याची अध्यात्मिकता, त्याची धार्मिकता, या सर्वांना आमच्या डोळ्यादेखत आम्ही नष्ट होताना पाहू   शकत नाही.”  
श्री.धनखड बहुसंख्य हिंदुंबाबत बोलताना म्हणाले की, “आम्ही बहुसंख्य असूनही सर्वांशी प्रेमाने वागतो, सहिष्णू, आनंदी तसेच निर्मळ वातावरण राहील यासाठी धडपडत असतो.” लोकसंख्येतील बदलात मुसलमानांच्या वाढणाऱ्या संख्येचा उल्लेख करत ते म्हणाले की,” ते बहुसंख्य होतात तेव्हा त्यांचा व्यवहार हा क्रूर, निर्दयी आणि बेफिकिरीचा असतो. ते दुसऱ्या लोकांच्या श्रद्धांना पायी तुडवण्यात आनंद मानतात, हे अत्यंत चिंताजनक आहे.” ते पुढे म्हणाले की, “आम्हा सर्वांना डोळ्यासमोर एक उद्देश ठेवून तसेच समर्पित भावाने काम करावे लागेल. आम्हाला एक संघटित समाज निर्माण करावा लागेल, जो योग्य दिशेने विचार करेल. जो जात, पंथ, संस्कृती, श्रद्धा आणि चालीरिती या कारणांसाठी स्वतःला गटामध्ये विभाजित करणार नाही. आमची समृद्ध संस्कृती निकामी असल्याचे सांगत त्यावर घाला घातला जात आहे. हे करण्यामागे देशाला उद्ध्वस्त करण्याची त्यांची योजना आहे. अशा शक्तींवर वैचारिक तसेच मानसिक हल्ला करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्हाला आमच्यातील भेद मिटवावे लागतील, राष्ट्रवादी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. राष्ट्रवादी दृष्टिकोन आला की मनातील संकुचित विचार नष्ट होतात आणि देशाचा गौरवशाली परंपरांचा अभिमान जागृत होतो, कारण आम्हाला मिळालेला तोच तर एक महान सांस्कृतिक वारसा आहे.”
येणाऱ्या संकटापासून सावध रहाण्याचा इशारा देत उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, “भारताच्या सज्जन प्रकृतीला विभाजनकारी संकटापासून वाचवण्या-साठी तत्काळ कृती करण्याची आवश्यकता आहे. स्थिरता आणि समृद्धता देशात टिकण्यासाठी समाजाला संघटित तसेच सुरक्षित केण्याची गरज आहे.”  
धनखड म्हणाले की, “स्वाभाविकरित्या किंवा नैसर्गिकरित्या लोकसंख्येत होणारी वाढ ही त्रासदायक नसते. पण एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी रणनीती ठरवून लोकसंख्येत बदल घडवून आणणे हे देशाच्या दृष्टीने भयावह आहे. याला पद्धतशीरपणे निपटण्यात आले नाही तर ते हिंदुंच्या अस्तित्वाला आव्हान ठरू शकते. जाणीवपूर्वक लोकसंख्येत घडवून आणण्यात येत असलेला बदल हा               अणूबॉम्बच्या स्फोटाइतकाच विनाशकारी आहे. या लोकसंख्यावाढीच्या विकारामुळे किंवा धरणीकंपामुळे अनेक देशांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.”
भारतीय जनतेला सावध करताना ते म्हणतात की, “वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये आपले नाव झळकावे म्हणून काही राजकीय पक्षाचे नेते राष्ट्रहिताचा त्याग करायला मागेपुढे पहात नाहीत. छोट्याशा स्वार्थासाठी समाजहिताशी तडजोड करायला ते कधीही तयार असतात.
हे लक्षात ठेवा ! लोकसंख्येतील होत असलेला बदल हे भारतासमोर उभे राहिलेले फार मोठे संकट आहे. देशातील अनेक शहरे आणि विविध क्षेत्रात अशाप्रकारे होत असलेले बदल दृष्टीस पडत आहेत. ज्यामुळे त्या क्षेत्रातील हिंदूंना ते क्षेत्र सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेशातील काही भागात याने गंभीर रूप धारण केले आहे. त्याचे परिणामही आता दिसू लागले आहेत.''
    ऑपइंडिया स्टाफ़ १६.१०.२४

 

 
Powered By Sangraha 9.0