कथा एका प्रत्यावर्तनाची

17 Dec 2024 10:29:27
 
 मी इस्लाम का स्वीकारला व सनातन धर्मात का परतले? हीच या पुस्तकाची tagline आहे असे म्हणता येईल. प्रत्यावर्तन म्हणजे 'घरवापसी'. ओ.श्रुती हिचा हिंदू ते इस्लाम आणि नंतर इस्लाममधून सनातन धर्मात केलेला प्रवेश याचा प्रवास या पुस्तकात श्रुती हिने लिहिला आहे.
केरळमधील पेरला, कासरगोड जिल्ह्यात राहणाऱ्या एक हिंदू ब्राह्मण कुटुंबात श्रुतीचा जन्म झाला.   ती त्यांच्या घरातील सर्वात लहान मुलगी. तिला लहानपणापासून सतत सगळ्यांची भीती वाटत असे, आपल्या धर्माबद्दल तिला फारशी माहिती नव्हती तसेच तिला आपल्या धर्माबद्दल जे प्रश्न पडत, त्याची उत्तरं तिच्या आईवडिलांकडे नव्हती. त्याचा परिणाम होऊन ती आपल्या धर्माबाबत उदासीन झाली. एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले असूनही ती आपल्या धर्माबाबतच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकली नाही. शाळेत  तिच्या वर्गात असणाऱ्या मुस्लिम मैत्रिणींकडे मात्र त्यांच्या धर्माबद्दल संपूर्ण माहिती होती. त्यामुळे श्रुतीला त्यांचा धर्म सोपा तसेच चांगला वाटू लागला.  इस्लामचा एकेश्वरवाद,दिवसातून पाचवेळा नमाज अदा करणे,इस्लाम संबंधित दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे हे समजल्यावर इस्लाम धर्माचा अभ्यास करावा असे श्रुतीला मनापासून वाटू लागले. आणि मग त्याचे   पालन करताना तिची मजल चक्क धर्मांतर करण्याइतपत  गेली. आपल्या आईवडिलांना झुगारून श्रुती घरातून        निघून गेली.
हिंदू हेल्पलाईन कार्यकर्त्यांच्या मदतीने श्रुतीच्या आईवडिलांनी तिला शोधले, तोवर तिने आपले नाव बदलून रहमत असे ठेवले होते. तिला समुपदेशनासाठी हिंदू परिषदेच्या कार्यालयात आणले.  इथे तिची भेट 'आर्ष विद्या समाजम्'च्या आचार्य मनोज यांच्याशी झाली.  त्यांच्याशी झालेल्या संवादातून, चर्चेतून तिला मुस्लिम धर्माचा फोलपणा लक्षात आला आणि तिने मुस्लिम धर्माचा त्याग करून सनातन धर्माचा स्वीकार केला.  ती म्हणते,''बहुसंख्य लोकांना धर्मांतर ही शुल्लक बाब वाटते परंतु याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे.'' हा हिंदू समाजासाठी खूप मोठा धोका आहे असे तिचे म्हणणे आहे. आज श्रुती 'आर्ष विद्या समाजम्' ची संपूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम                करते. तिने तिच्यासारख्या अनेक मुलींना  पुन्हा आपल्या धर्मात आणण्यात मदत केलेली आहे.  
आजच्या काळातील हा ज्वलंत विषय असल्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.
कथा एका प्रत्यावर्तनाची -
ओ.श्रुती
Bouddhikam Books and Publicatons
Thiruvananthapuram, Kerala
Powered By Sangraha 9.0