अग्निदाहे न मे दुःखं
छेदे न निकषे न वा।
यत्तदेव महद्दु:खं
गुञ्जया सह तोलनम्॥
अर्थ- अग्नीत जाळण्याचे मला दुःख नाही, तोडण्याचे अथवा दगडावर घासण्याचेही मला दुःख नाही; परंतु गुंजेबरोबर तोलले जाणे मात्र मला अतिशय दुःखप्रद होते.
(सोन्याप्रमाणे असलेल्या उत्तम व्यक्तीला अधम व्यक्तीबरोबर तोलले जाते त्याचे जास्त दु:ख होते.)
सार्थ सुभाषितमाला - क्रमांक- ९२