संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.अबू धाबीमध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे. हे स्वामीनारायण मंदिर असून उद्घाटनानंतर १ मार्चपासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबू धाबीसाठी मार्गस्थ झाले आहे.
सनातन प्रभात १४.२.२४