शिवनेरी येथे १७ ते १९ दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव

16 Feb 2024 10:53:17
 
पुणे जिल्हातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची  संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस आणि अध्यात्मविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढारी १५.२.२४

 
Powered By Sangraha 9.0