अयोध्या रघुकुलाची राजकन्या श्रीरत्नादेवी कोरियाची महाराणी

17 Feb 2024 10:41:28
 
 प्रभू श्रीरामचंद्राच्या वंशात जन्मलेली राजकुमारी श्रीरत्ना ही कुणा एकेकाळी कोरियाची महाराणी होती. आजपासून २ हजार वर्षांपूर्वी रघुकुलातील राजा पद्मसेन व राणी इंदुमती यांच्या पोटी जन्मलेली राजकुमारी श्रीरत्ना ही दैवी प्रेरणेने समुद्रमार्गाने एका विशेष जहाजातून कोरियाला पोचली आणि कोरियाची महाराणी बनली. कोरियाचे तत्कालीन सम्राट सुरो यांच्याशी श्रीरत्नाचा विवाह झाला होता. त्यांचे वंशज आजही कोरियात आहेत.
दक्षिण कोरियाच्या दिल्लीतील राजदूतांनी थेट भारत सरकारला विनंती केली की आम्हालाही (दक्षिण कोरियालाही) राम मंदिर उभारणीच्या आनंदात सहभागी करून घ्या...तेव्हा राजधानी दिल्लीही थक्क झाली. उत्तर प्रदेश सरकार आणि दक्षिण कोरियातर्फे संयुक्तपणे ‘राणी हो पार्क’ – ('हो' हे श्री रत्ना देवींचे कोरियन नाव) या स्मारकाचे नाव झाले. राजकुमारीच्या कोरियापर्यंतच्या प्रवासाची आठवण म्हणून एका जहाजाची लक्षवेधक प्रतिकृती साकारली आहे. दोन्ही देशांच्या अध्यात्मिक-सांस्कृतिक नात्याचे ते प्रतिक आहे.


पुढारी १७/१२/२३
Powered By Sangraha 9.0