यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी कृषी क्षेत्रातील थोर व्यक्तीला 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर होणे ही शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वामिनाथन यांना ' अन्न सुरक्षेचा प्रणेता' म्हणून संबोधले जाते. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ.स्वामीनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षण भारतीय शेती आणि येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी समर्पित केले. दुष्काळात अमेरिकन मिलो ज्वारीवर दिवस कंठणाऱ्या आपल्या देशाची ओळख आज गहू, तांदूळ याचा अतिरिक्त साठा असलेला देश अशी आहे.
अॅग्रोवन २१/२/२४