ज्ञानवापीतील व्यास तळघरात हिंदुंचा पूजेचा अधिकार अबाधित

28 Feb 2024 10:47:01
 
ज्ञानवापी मंदिराच्या व्यास तळघरात हिंदुंच्या पूजेस आव्हान देणारी मुस्लिमांची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने दि. २६ फेब्रुवारी रोजी  फेटाळून लावली. त्यामुळे व्यास तळघरात पूजा करण्याचा हिंदुंचा अधिकार कायम राहणार आहे.
ज्ञानवापी मंदिराच्या दक्षिणेकडील अर्थात व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार वाराणसी न्यायालयाने काशिविश्वानाथ मंदिर ट्रस्ट दिला आहे. त्याला मुस्लीम पक्षाकडून म्हणजेच अंजुमन इंतेजामियाने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मुं. तरुण भारत २७.२.२४
Powered By Sangraha 9.0