विल्यम फिंचच्या आठवणीतील राममंदिर

07 Feb 2024 10:28:34
 
 १६०८ सालच्या ऑगस्ट महिन्यात विल्यम फिंच हा इंग्रज यात्री भारतात आला होता. त्याने आपल्या अयोध्या भेटीबद्दल लिहून ठेवले आहे. ''हजारो वर्षांपासून अयोध्या नगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता इथे अवशेष उरले आहेत. ४०० वर्षांपूर्वी बांधलेल्या रामचंद्रांच्या महालाचे आणि त्यावेळच्या घरांचे अवशेषही आहेत. भारतीय या राजाला भगवान समजतात.
इथे अनेक पुरोहित राहतात. त्यांच्याजवळ इथे येणाऱ्या यात्रेकरूंची नोंद आहे. ४ लाख वर्षांपासून शरयू नदीत स्नान करण्यासाठी इथे श्रद्धाळू मोठ्या संख्येने येतात. नदीपासून २ कोस दूर असलेल्या गुंफा चिंचोळ्या आहेत. तिथे श्रीरामांच्या देहाची रक्षा विसर्जित केली आहे असे समजले जाते.”
कारसेवकांनी उध्वस्त केलेल्या बाबरी ढाचाचे बांधकाम आणि त्याकाळची इतर बांधकामे यातला फरक आपल्याला सहज लक्षात येईल. राममंदिर पाडून मशीद बांधली हे लक्षात येते.
विल्यम फिंचचा पुढे बगदाद इथे मृत्यू झाला.
आइन-ए-अकबरी या ग्रंथातही भगवान विष्णूच्या १० अवतारांचा उल्लेख असून श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला असे लिहिले आहे.
विल्यम फिंचच्या लेखनाचा ‘अर्ली ट्रॅव्हल्स टू इंडिया १५८३-१६१९’ या पुस्तकात उल्लेख आहे. राम मंदिराच्या वतीने बाजू मांडणारे वकील सी.एस.वैद्यनाथन यांनी सुप्रीम कोर्टात याचा संदर्भ दिला होता.
विल्यम फिंचने पुढे लिहिले आहे, “देशाच्या विविध भागातून इथे आलेले भक्त आपल्याबरोबर तांदळाचे दाणे प्रसाद रुपात नेतात. व्यापारी दृष्टीनेही अयोध्या समृद्ध आहे.याचाच अर्थ हे एकेकाळी मोठे ठिकाण होते.”
क्रूर इस्लामी आक्रमक, इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर डावे आणि तथाकथित सेक्युलर यांनी आपल्याला हवा तसा इतिहास बदलून टाकला, कधी तलवारीच्या तर कधी लेखणीच्या जोरावर. मंदिराच्या जागी मशीद उभारली आणि खोटा तसेच चुकीचा इतिहास शिकवला गेला. यातील डाव्यांना, जे रामायण आणि रामचरितमानस हे खोटे आहे म्हणतात,  त्यांना तर सुप्रीम कोर्टानेही फटकारले.  
आता राममंदिर उभारले जात आहे. ते अस्तित्वात होतेच याचे दाखलेही आक्रमकांकडूनच समोर येत आहेत.          

ऑप इंडिया  १३/११/२३  
 

Powered By Sangraha 9.0